भक्ति योग २०२५
ताल वारकरी.. योग करी आरोग्यपंढरी..
जिल्हा परिषद सांगली, चितळे डेअरी आणि विश्व योगदर्शन केंद्र मिरज-सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, ५ लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग असलेला, योग व भक्तिसंयोगाचा अद्वितीय कार्यक्रम! २१ जून २०२५ रोजी योग दिन, एकादशी आणि जागतिक संगीत दिनाचे त्रिसंगम साधणारा 'भक्तियोग' – चला, सामील होऊया एका नव्या ऐतिहासिक पर्वात!
यांच्या संयुक्त विद्यमाने
समस्त सांगलीचे मन:पूर्वक अभिनंदन व आभार..💐
“भक्तियोग” च्या निमित्ताने सर्व सांगलीकरांनी आपल्या सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन घडवले. या प्रवासातील अनुभव शब्दबद्ध होऊन चित्रे, कथा, कविता, चारोळ्या आणि अशा अन्य साहित्यिक प्रकारांमध्ये व्यक्त होऊ लागले आहेत. कृपया आपले लेखन-अभिव्यक्ती, अभिप्राय इत्यादी zpsanglibhaktiyog@gmail.com या ई-मेल वर पाठवावे, जेणेकरून यांचा संग्रह व प्रकाशन करणेस शक्य होईल.
धन्यवाद!
जिल्हा परिषद, सांगली
वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद. भक्तियोगाची नोंद होण्यासाठी सर्व सांगली जिल्हा करेल एकाच वेळी वारकरी तालावरील योगसाधना, होईल साक्षीदार या आध्यात्मिक क्षणांचा...!
... आणि साधेल ऐतिहासिक असा अनोखा भक्तियोग
काय आहे भक्ति योग?
दिनांक २१ जून २०२५ | शनिवार | जागतिक योग दिन | योगिनी स्मार्त एकादशी, जागतिक संगीत दिन सकाळी ८.०० ते ८. ४५ वाजता.
एकतानता
सर्व जण करतील योगासने एकाच वेळी एकाच तालावर समान योग रचनांसहित. केंद्रांवरील विहित योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली.

भक्तियोग
शारीरिक व मानसिक आरोग्यास आवश्यक योग शैली व आध्यात्मिक वारकरी संप्रदायाचा भक्तिमय ठेका यांचा संयोग साधून होणार आहे एक नवे योग संस्करण.

संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये
सहभागी होणार ५ लाखांहून अधिक आबालवृद्ध नागरिक, विद्यार्थी, शासकीय व खाजगी संस्था, आस्थापना व उद्योग..!

केंद्र
सांगली महानगरपालिका क्षेत्र व १० तालुक्यांमधील विहित शाळा, महाविद्यालये, क्रीडांगणे, प्रांगणे, निवासी संस्था, औद्योगिक व्यापारी केंद्रे, युवा मंडळे, क्लब्स इत्यादींची पोर्टलवर "केंद्र" म्हणून नोंदणी होईल.

आभासी प्रक्षेपण व सहभाग
सर्व केंद्रे ZOOM Webinar द्वारे मुख्य केंद्राशी जोडली जातील. मुख्य केंद्राचे थेट प्रक्षेपण YouTube Live द्वारे होईल. मुख्य केंद्र:
छत्रपती शिवाजी स्टेडियम, सांगली शहर.

रूपरेषा अंकांमध्ये
विविध घटकांची मांडणी आकडेवारीच्या स्वरूपात करून विषयाची सुसंगत आणि स्पष्ट माहिती देणारी सादरीकरणाची पद्धत. सांख्यिकीय विश्लेषणाद्वारे विषयाची नेमकी रूपरेषा मांडली जाते.
केंद्रे
उपकेंद्रे
नोंदणीकृत सदस्य
जागतिक रेकॉर्ड
डिजिटल दुनियेतून
बातम्या व माहिती
ताज्या घडामोडी आणि उपयुक्त माहिती यांचे प्रभावी सादरीकरण. वाचकांपर्यंत सत्य, अचूक आणि वेळेवर माहिती पोहोचवण्यासाठी समर्पित विभाग.
सांगलीत योगाचे नवीन पर्व
संपूर्ण सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक भक्तियोग पर्व! संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये घडणार आहे एक आध्यात्मिक आणि आरोग्यदायी…
आपली मते व अभिप्राय
आपले विचार आम्हाला सांगा – कारण तुमचा अनुभवच आमच्या प्रगतीचा मार्गदर्शक आहे.